दौंड मध्ये भटक्या कुत्र्यांचा लहान बालकावर हल्ला !

Spread the love

लोकशासन – प्रतिनिधी: दौंड शहर

दौंड – (ता.०९) दौंड शहरात भटक्या कुत्र्यांचा लहान बालकास चावा घेतला असल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.दौंड शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, आज एका लहान बालकास भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हि संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांनी वेळोवेळी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी दौंड नगरपालिकेकडे लेखी व तोंडी स्वरूपात केली असतानाही याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

गेल्या एक वर्षात शहरातील अनेक नागरिकांना तसेच लहान बालकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तरीदेखील दौंड नगरपालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का, असा सवाल आता संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button