शेळगाव येथील मॉर्डन स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

Spread the love

लोकशासन – प्रतिनिधी:किरण माने,शेळगाव

शेळगाव : (ता.१०) ता.इंदापूर येथील मॉर्डन इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार (दिनांक १०) रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या स्नेहसंमेलनामध्ये नर्सरी पासून ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.या कार्यक्रमांमध्ये बालगीते, मराठी,हिंदी गाणी, मराठी लावणी, देशभक्तीपर गीते,विविध वेशभूषा करत साजरी केली.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पालकांनी आणि ग्रामस्थांनी बक्षीसाच्या रूपाने वाव दिला.यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब चवरे,केंद्रप्रमुख संभाजी आजबे, राहुल जाधव यांनी मनोगतातून शैक्षणिक संस्थेची होत असलेली प्रगती पाहून अभिनंदन केले.या स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून चालू शैक्षणिक वर्षांमध्ये विविध स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच खेळाडूंचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मॉर्डन स्कूलच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले.

यावेळी मॉर्डन स्कूलचे संस्थापक प्रा.भीमराव जाधव,ज्येष्ठ नेते बाबासाहेब चवरे,माजी सरपंच रामदास शिंगाडे,माजी जिल्हा परिषद सदस्या भारती दुधाळ,उपसरपंच रेश्मा जाधव,समता परिषदेचे अध्यक्ष राहुल जाधव,केंद्रप्रमुख संभाजी आजबे, ग्रामपंचायत सदस्य मोहन खराडे, पोलीस पाटील उषा वाघमोडे,शुभम शिंगाडे,पै.अजिनाथ जाधव,प्राचार्य संदीप जाधव,मनोहर जाधव यांच्यासह पालक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन स्वप्नाली कुंभार,प्रेमला शिंगाडे, विद्यार्थी संस्कार जाधव,स्वरा चाटे यांनी केले तर आभार योगिता धापटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button