इंदापूर – (ता.१२ )ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिह्ल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कडून इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी सुमारे ७० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष शेखर वढणे यांनी इंदापूर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली होती सदरील मागणी नुसार इदापूर तालुक्यातील सरडेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग ते देशपांडे वस्ती या कामासाठी कामासाठी १० लक्ष, सरडेवाडी येथील चेतना कॉलेज ते देशपांडे वस्ती रस्ता १० लक्ष रुपये, गलांडवाडी २ भोंग वस्ती रस्ता १० लक्ष, गलांडवाडी २ अरुण भोंग ते रुक्मिणी भोंग वस्ती रस्ता करणे १० लक्ष, गलांडवाडी २ महात्मा फुले जिम ते बायपास रोड प्लेविग ब्लॉक १० लक्ष रुपये तर इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे असलेल्या पुरातन महादेव मंदिर सभा मंडपासाठी १० लक्ष असे एकूण ७० लक्ष रुपयांचा निधी मंत्री जयकुमार गोरे यांच्या कडून मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी सांगितले कि इंदापूर तालुक्यातील विविध वाडीवस्तीना जोडणारे रस्ते सभा मंडप व इतर पायाभूत सुविधांसाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाला आहे.तर पुढे बोलताना इंदापूर तालुक्यातील विकास कामांना गती देण्यासाठी भारतीय जनता पार्टी चे इंदापूर चे नेते प्रवीण माने यांच्या माध्यमातून इंदापूर भाजपा कार्यशील राहील असे सांगितले.
“लोकशासन” सोबत बोलताना इंदापूर तालुका भाजपा मध्य चे अध्यक्ष राजकुमार जठार यांनी सांगितले कि निमगाव केतकी येथील महादेव मंदिरासाठी गेली अनेक वर्षा पासून प्रलंबित असलेला प्रश्न ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून सुटला आहे.भविष्यात देखील तालुक्यातील अनेक विकास कामे भारतीय जनता पार्टी व प्रवीण माने यांच्या माध्यमातून सोडविण्यात येतील.