भवानीनगर मध्ये रोडरोमिओना पोलीसांचा दणका.

Spread the love

भवानीनगर:२२(सा.वा.) गणेश गुप्ते -उपसंपादक

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे रोडरोमिओना वालचंदनगर पोलीसांनी चांगलाच दणका दिला.
भवानीनगर परिसरात अनेक शाळां, कॉलेज भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी अनेक रोड रोमिओ विनाकारण फिरणे, ट्रिपल सीट, एका ठिकाणी गोळा होत जमाव जमवणे आणि यातूनच दहशत माजवणे असे प्रकारचा त्रास भवानीनगर परिसरात होत आहे
.

वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मिठ्ठापल्ली, पोलिस हवालदार नानासाहेब आटोळे ,माणेर यांनी मिळून भवानीनगर येथील भवानी माता मंदिराच्या चौकामध्ये विनाकारण घिरट्या घालणारे व जमाव जमवणारे बुलेटस्वार यांना चांगलीच तंबी दिली.

यानंतर या वाहनचालकांकडे वाहनाचे लायसन्स, वाहनांची कागदपत्रे यांची तपासणी करण्यात आली तसेच यापुढे भवानीनगर किंवा परिसरामध्ये विनाकारण शाळेच्या परिसरामध्ये घिरट्या घालणाऱ्यांवरती लक्ष ठेवण्यात येईल तसेच विनाकारण फिरल्यास किंवा विनाकारण चौका चौकामध्ये जमाव करून थांबल्यास किंवा वाढदिवस साजरा केल्यास  कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पीएसआय मिठ्ठापल्ली यांनी बोलताना दिली.

”शाळा सुटण्याच्या वेळी व शाळा भरण्याच्या वेळी अनेक मोटरसायकल स्वार भरदाव वेगाने शाळेच्या आजूबाजूने फिरत असतात अशांची आता गय केली जाणार नाही विनाकारण घिरट्या घालणे अशा प्रकारचे कोणी कृत्य करत असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येणार आहे.-श्री.मिठ्ठापल्ली, पोलीस उपनिरीक्षक वालचंदनगर पोलीस ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button