
लोकशासन – प्रतिनिधी : इंदापूर ग्रामीण
पुणे जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून आज दिनांक २२ जानेवारी रोजी झालेल्या उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत इंदापूर पंचायत समितीचे जवळपास “आठ” उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत.
सुमारे “आठ” वर्षांनी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भरलेल्या उमेदवारी अर्जा मधील त्रुटींमुळे “आठ” उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत.त्यामुळे वर्षाच्या पहिल्याच जानेवारी महिन्यात लागलेला हा “८” अजून कोणकोणत्या निवडणुकीत किती जणांनसाठी राजकीय “घाट” ठरणार हे पुढील काळात होणाऱ्या ग्रामपंचायतीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्पष्ट होईल.