
इंदापूर:२४ (प्रतिनिधी) इंदापूर आगारात चालक दिन साजरा करण्यात आला. सुरक्षित विना अपघात पंचवीस ते तीस वर्षे सेवा व उकृष्ट के.पि.टी.एल देणारे चालकांचा गुलाब पुष्प देऊन अखिल भारतीय ग्राहक पंचायत इंदापूर तालुका यांच्याकडून सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.दि.(२४) रोजी इंदापूर आगारांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष,तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य पुणे दिलावर तांबोळी, इंदापूर तालुका अध्यक्ष सचिन रणसिंग, उपाध्यक्ष नानासो कदम, औदुंबर हुलगे, इंदापूर तालुका सचिव गणेश गुप्ते, महिला सचिव नाजिया सय्यद, कोषाध्यक्ष दादासाहेब भोंगळे, अनिल मारकड, दादासाहेब पोंदकुले, भवानीनगर अध्यक्ष मंगेश खरात, तसेच इंदापूर आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी, सहाय्यक वाहतूक अधीक्षक , संजय वायदंडे, वाहतूक निरीक्षक दत्तात्रय भोसले, सहाय्यक वाहतूक निरीक्षक चौगुले साहेब, आगार लेखाकार रवींद्र डोके, वरिष्ठ लिपिक तौसिफ शेख व बागवान हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रस्तावना वरिष्ठ लिपिक तौसीफ शेख यांनी केले. तसेच सहाय्यक वाहतूक अधीक्षक वायदंडे यांनी उपस्थित कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष दिलावर तांबोळी साहेबांनी उपस्थित कर्मचारी यांना चालक दिनानिमित्त मार्गदर्शन केले तसेच गणेश गुप्ते सचिव यांनी ग्राहक पंचायतीचे कामकाजाची माहिती उपस्थित चालकांना दिली. आगार व्यवस्थापक गोसावी साहेब यांनी महामंडळातर्फे सुरू असलेल्या विविध कार्यक्रमाबाबत सखोल माहिती दिली व मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महोदयांचा रा.प. महामंडळातील चालकांसाठी संदेश असणारे आवाहन पत्रकाचे वाचन केले व नंतर वाटप करण्यात आले. शेख यांनी सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.