
लोकशासन-प्रतिनिधी: गणेश गुप्ते , भवानीनगर
भवानीनगर : येथील सणसर ग्रामपंचायत भागातील प्रभाग क्रमांक एक मधील दलित वस्ती रस्ता अर्धवट राहिल्याने तो पूर्ण करण्यात यावा अशी मागणी भाग्यनगर येथील दलित वस्ती मधील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत अधिकारी सचिन पवार यांना केली आहे.
हा रस्ता सतत वर्दळीचा असून पावसाळ्यामध्ये हा रस्ता चिकलमय होत असतो रस्त्याने ये – जा करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यातच या रस्त्याच्या कडेला विहीर असून त्याही विहिरीला संरक्षण कठडे बसवावेत. व दलित वस्ती मधील राहिलेला रस्ता पूर्ण करून देण्यात यावा अशी मागणी संजय गायकवाड, आबा गुप्ते, विनायक मिसाळ, संजय दुपारगुडे, गोट्या चव्हाण, विकास मोरे, भारत पांढरे, महेंद्र चव्हाण, अशोक गायकवाड, पप्पू पांढरे, सुरेश शिंदे, सिकंदर शेख, विलास देवकुळे आदी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे.