
लोकशासन-प्रतिनिधी: गणेश गुप्ते, भवानीनगर
भवानीनगर : सणसर विभागातील महावितरण शाखेमधील त्या मुजोर वायरमनवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निंबोडी ,भाग्यनगर, अशोकनगर या भागातील ग्राहक करीत आहेत. सध्या इंदापूर तालुक्यामध्ये सर्वच ठिकाणी विजतारांना फायबर केबल बसवण्यात आल्या आहेत. व त्यामुळे इंदापूर तालुक्यातील विज जोरीचे प्रमाण कमी झाले आहे. आणि वीज देखील उच्च दाबाने मिळत आहे. तसेच प्रत्येक महिन्याला महावितरण कंपनीचे वायरमन वीज बिल भरण्यासाठी तकादा लावत आहेत.
त्याचप्रमाणे ग्राहक देखील वीजबळ वेळेवर भरत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून भाग्यनगर, अशोकनगर ,निंबोडी , याच भागातील वीज सकाळी गायब होते ती संध्याकाळीच येते त्यामुळे ग्रामस्थांन मध्ये संतापाची लाट आहे. लाईट बिल वेळेवर येते मात्र वीज वेळेवर मिळत नाही असा संताप देखील ग्रामस्थांनी उपस्थित केला. ‘भीक नको पण कुत्र आवर’ असे म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. त्यातच हा वायरमन सेवा देत असताना अनेक महिला ग्राहकांना सन्मानाची वागणूक देत नाही. विजे बाबत काही समस्या आल्यास ग्राहकाने फोन केल्यास ग्राहकाचीच उलट तपासणी घेतो. गावातील फ्युज गेल्यास, किंवा काही आपत्कालीन वेळ गावामध्ये आल्यास हा मुजोर वायरमन कधीही फोन घेत नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी एका महिलेला विज बिला वरून अपशब्द वापरल्याने गावकऱ्यांनी या मुजोर वायरमनची तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनच गाठले होते. मात्र तरी देखील ग्रामस्थांनी सहकार्याची भूमिका ठेवत समज देऊन त्याला सोडण्यात आले. मात्र तरी देखील या मुजोर वायरमन ची मुजोरी वाढतच चालली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
तसेच हा वायरमन त्यांच्या अधिकाऱ्याला देखील अपशब्द वापरत असतो. व त्याच्या सोयीने मनमानी करत असतो ग्राहकांना देखील अपशब्द भाषेत बोलत असतो. मात्र या मुजोर वायरमन वर कारवाई कोण करणार असा सवाल उपस्थित होत आहे ? फ्युज गेल्यास किंवा काही किरकोळ प्रॉब्लेम झाल्यास विनाकारण ग्राहकांना त्रास देण्याचे हेतूने उशिरा फ्युज बसवणे, अशा प्रकारचा सर्रास प्रकार करतो. याबाबत मुजोर वायरमेन वरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी या भागातील वीज वितरण ग्राहकांनी केली आहे.