“मतपेटीत भवितव्य बंद; मतदारांनी बजावला मतदानाचा पवित्र हक्क.”

Spread the love

लोकशासन-गणेश गुप्ते,उपसंपादक

इंदापूर:(०७) गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला निवडणुकीचा रणसंग्राम आज मतदानाने शांत झाला. आज झालेल्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी उत्साहाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.
सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांनी आणि उत्साही तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. दुपारी उन्हाचा कडाका वाढल्याने मतदानाचा वेग काहीसा मंदावला होता, मात्र सायंकाळी पुन्हा मतदारांनी केंद्रांकडे धाव घेतली.
निवडणूक आयोगाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पोलीस प्रशासनाकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती.
काही किरकोळ तांत्रिक अडचणी वगळता संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले असून सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे.

प्रशासनाचा दुजाभाव:लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची नाकेबंदी?
“कुठे ‘एंट्री’, कुठे ‘नो एन्ट्री’; वार्तांकनावेळी पत्रकारांना प्रशासनाचा संमिश्र अनुभव.” पत्रकार याना काही ठिकाणी प्रवेश, तर काही ठिकाणी मज्जाव काही मतदान केंद्रांवर पत्रकारांना सन्मानाने प्रवेश देऊन वार्तांकन करू दिले गेले. मात्र, काही संवेदनशील आणि महत्त्वाच्या केंद्रांवर तैनात असलेल्या पोलिसांनी पत्रकारांना आत जाण्यापासून मज्जाव केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button