निमगाव केतकी शेळगाव गटात राष्ट्रवादीच्या घड्याळाचा झेंडा फडकणार की भाजपाचे कमळ फुलणार.

Spread the love

लोकशासन-किरण माने, प्रतिनिधी
शेळगाव :(८) पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान शनिवार (दि. ७) रोजी पार पडले.

या निवडणुकीमध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र येत संपूर्ण निवडणूक एकत्र लढवली आहे.तर माजी आमदार यशवंत माने,प्रदीप गारटकर आणि माजी सभापती प्रवीण माने यांनी एकत्रित येत भाजपकडून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.

निमगाव गटामध्ये पंचायत समितीसाठी शेळगाव गण आणि निमगाव केतकी हे गण येतात.निमगाव केतकी जिल्हा परिषद गट आणि गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पार्टी यांची जोरदार चुरशीची लढत पहायला मिळाली आहे.परंतु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने या निवडणुकीमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसून आला नाही.


इंदापूरचे आमदार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्रित येऊन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावरती लढवणार असल्याचे सांगितले आहे.

माजी सभापती प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांनी भाजपच्या रूपाने इंदापूर तालुक्यामध्ये मतदारांना पर्याय दिला आहे असे त्यांनी सांगितले.

निमगाव शेळगाव जिल्हा परिषद गटातील शेळगाव,निमगाव केतकी,निमसाखर,शिरसटवाडी, कडबणवाडी,रुई यांच्यासह इतर गावात मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवरती मतदारांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोठी रांग पाहायला मिळाली.

शेळगाव पंचायत समिती गणामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांनी स्थानिक उमेदवाराला उमेदवारी न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली.

भारतीय जनता पार्टीने गावातील स्थानिक उमेदवार शुभम भारत शिंगाडे यांना उमेदवारी दिली.शुभम शिंगाडे हा शेळगाव गावचा भूमिपुत्र असल्याने गावामध्ये क्रॉस वोटिंग होण्याची देखील मोठी शक्यता मतदारांनी व्यक्त केली आहे.जिल्हा परिषद सदस्यासाठी सोनाली तुषार जाधव आणि दिपाली सचिन राऊत यांनी एकमेकांपुढे मोठे आव्हान उभे केले होते.

तसेच निमगाव केतकी पंचायत समिती गणामध्ये गोरख आदलिंग व रणजीत भोंग यांच्यामध्ये देखील काटे की टक्कर होणार असल्याचे दिसून आले. सोमवार दि. ९ रोजी मतमोजणी झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.

पाठीमागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत कमतरता दिसून आली आहे.याचा फायदा कोणाला होणार याकडे आता लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी कडून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तर भारतीय जनता पार्टी कडून माजी सभापती प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button