
लोकशासन-प्रतिनिधी:गणेश गुप्ते,भवानीनगर
इंदापूर तालुक्यातील सणसर परिसरातील भाग्यनगर येथील गटर लाईनचे घाण पाणी शाळेच्या शेजारी सोडल्याने या गटर लाईनचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी भाग्यनगर ग्रामस्थांनी केली आहे.आज दिनांक ३१ मार्च २०२५ सर्वच विभागातील शासकीय अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी कर भरून घेण्यासाठी ग्रामस्थांकडे तकादा लावत आहेत.मात्र अजून काही गावांमध्ये गटर लाईनचे काम अर्धवट स्वरूपात राहिले आहे.
गोविंदराव पवार विद्यालय भाग्यनगर येथे गेल्या अनेक वर्षापासून गटर लाईन ची परिस्थिती जैसे – थे परिस्थिती असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने अनेक वेळा फक्त पाहणी करण्यात आली. मात्र कोणत्याही प्रकारचे काम मात्र झाले नसल्याचे ग्रामस्थांनी आरोप केला आहे.
शेजारीच शाळा असल्याने या गटर लाईन मुळे डेंगू चिकन गुण्या, गोचीड ताप यासारखे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’असा प्रकार सणसर ग्रामपंचायतचा झाला असून अनेक वर्षापासून गावाचे गटाराच्या पाण्याची व्यवस्था प्रलंबित आहे. वेळोवेळी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन देखील या पाण्याची व्यवस्था करत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाकडे कर भरणे आवश्यक आहे. मात्र सोयीसुविधा देखील मुबलक प्रमाणात पुरवणे ही देखील ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी आहे.भाग्यनगर मध्ये अनेक सोयी सुविधांचा अभाव आहे. पिण्याच्या पाण्याची बोरवेल मधून उच्च दाबाने पिण्याचे पाणी मिळत नाही. अनेक भागांमध्ये दिवाबत्ती नाही. तरी ग्रामपंचायत प्रशासनाकडून वर्षानुवर्ष कर आकारणी सुरूच आहे. मात्र त्या प्रमाणात सोय सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. ज्या भागामध्ये पाणी, वीज, दिवाबत्ती, अशा प्रकारच्या सुविधा मिळत नसल्यास तो कर आकारू करू नये असा शासन निर्णय असून या शासन निर्णयाला देखील केराची टोपली दाखवली जात आहे . मात्र याबाबत अनेक ग्रामस्थ अन्नभिन्न आहेत . या भागातील उपाययोजना कराव्यात असे मागणे भाग्यनगर मधील ग्रामस्थ करीत आहेत.
याबाबत आमचे प्रतिनिधी गणेश गुप्ते यांनी सणसर ग्रामपंचायती चे ग्रामविकास अधिकारी सचिन पवार यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.