
लोकशासन-प्रतिनिधी:गणेश गुप्ते,भवानीनगर
सणसर ग्रामपंचायतच्या परिसरामधील भाग्यनगर वार्ड नंबर एक मधील वीज वितरण करणारी (डिपी) ट्रांसफार्मर ने अचानक पेट घेतला.
सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र गेल्या चार दिवसापासून भाग्यनगर मधील ट्रांसफार्मर वरती लोड येत असल्याने अनेक वेळा ट्रांसफार्मर जळत असून सणसर महावितरण चे अधिकारी पाहणी करून गेले मात्र आज दि.१ रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सोसाट्याचा वारा सुटला व पाऊस देखील सुरू झाला. यानंतर भाग्यनगर अशोकनगर या भागातील वीज गायब झाली. तसेच ट्रांसफार्मरच्या खालच्या बाजूला असणारे केबल ने अचानक पेट घेत सर्व केबल जळून खाक झाली असून काही ग्रामस्थांनी ट्रांसफार्मर जळाल्याची शक्यता वर्तवली आहे.
त्यातच सध्या उन्हाळा सुरू असल्याने गेल्या चार दिवसापासून सलग ट्रांसफार्मर मध्ये बिघाड होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यावरती तात्काळ उपाययोजना कराव्यात अन्यथा आम्हाला महावितरण व ग्रामपंचायत सणसर वरती आंदोलन करावे लागेल असा इशारा भाग्यनगर मधील ग्रामस्थांनी दिला आहे.