दिशादर्शक फलकाचा अभाव; निमसाखर ५४ फाटा परिसरात अपघातांचा धोका वाढला

Spread the love

लोकशासन-सत्यजित रणवरे, संपादक

निमसाखर : (१७) निमसाखर ५४ फाटा (ता. इंदापूर) घोरपडवाडी येथे दिशादर्शक फलक नसल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अपघातांचा धोका गंभीर बनला आहे.

वळणावर कोणताही इशारा अथवा मार्गदर्शक फलक नसल्याने अनेक वाहने थेट चारीत घुसत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते, हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असूनही संबंधित विभागाकडून आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा अपरिचित वाहनचालकांना वळणाचा अंदाज न आल्याने जीवघेणा धोका निर्माण होत आहे.
ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

“अपघात घडल्यावरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तात्काळ दिशादर्शक फलक बसवावा, वेगमर्यादा दर्शविणारे चिन्ह लावावे तसेच वळणावर परावर्तित (रिफ्लेक्टर) व्यवस्था करावी, अशी मागणी वाहनचालकान मधुन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button