उजेडातही स्टेट लाईट सुरू; सणसर ग्रामपंचायतीची ऊर्जा बचतीकडे पाठ…

Spread the love

लोकशासन– गणेश गुप्ते, उपसंपादक

भवानीनगर :(१७) ऊर्जा बचतीचे महत्त्व अधोरेखित केले जात असताना सणसर ग्रामपंचायत परिसरात मात्र दिवसा उजेडातही स्टेट लाईट सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे वीजेचा अनावश्यक अपव्यय होत असून सार्वजनिक निधीवर ताण वाढत असल्याची टीका नागरिकांतून होत आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत सूचना दिल्या, तक्रारी केल्या; मात्र परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. “ऊर्जा बचतीच्या घोषणा फक्त कागदावरच का?” असा सवालही उपस्थित केला जात आहे.
दिवसभर स्टेट लाईट सुरू राहिल्याने शासनाच्या निधीचा अपव्यय होत असून याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. नागरिकांनी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दिवसा दिवे बंद ठेवण्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

परिसरातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी याबाबत सूचना देऊनही प्रशासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासनाची भूमिका काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे
.

ऊर्जा बचतीच्या आणि खर्च नियंत्रणाच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या आहेत का, असा सवालही स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन स्टेट लाईट व्यवस्थापनात सुधारणा करावी आणि वीज अपव्यय थांबवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ग्रामपंचायत अधिकारी – सचिन पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले त्या ठिकाणची पाहणी करून योग्य उपाय योजना करण्यात येतील.
महावितरण सणसर शाखा अभियंता– बोरनाळे साहेब यांच्या शी संपर्क साधला असता ते म्हणाले आम्ही संबंधित ग्रामपंचायतीला वेळोवेळी याबाबत पत्र व्यवहार केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button