
लोकशासन : प्रतिनिधी-गणेश गुप्ते,इंदापुर ग्रामीण
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील निमसाखर या गावामध्ये दरवर्षी पारंपरिक पद्धतीने तीन दिवस शिवजयंती उत्सव साजरा केला जातो.यामध्ये रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, महिलांसाठी होय मिनिस्टर यासह वेगवेगळे सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळते.मात्र निमसाखर मधील ग्रामस्थ, शिवजयंती उत्सव समिती व शिवभक्तांन कडून या वर्षी एक दिवस साध्या पध्दतीने शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे शिवजयंती उत्सव समिती व शिवभक्तांन कडून हा निर्णय घेण्यात आला असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण म्हणून या वर्षी निमसाखर मध्ये साध्या पध्दतीने शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.
१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले जाणार असून.प्रतिमा पुजना नंतर विठ्ठल मंदिर येथे रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8007108688