
लोकशासन-किरण माने , प्रतिनिधी
शेळगाव:(१९) येथे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि ज्यांनी मुघलांना रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका असे ठणकवून सांगणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती गुरुवार (दिनांक १९) रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शेळगावच्या लोकनियुक्त सरपंच उर्मिला शिंगाडे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
उपस्थित शिवप्रेमींनी महाराजांच्या घोषणा देऊन जय जयकार केला.
यावेळी छत्रपती कारखान्याचे माजी संचालक ॲड.लक्ष्मणराव शिंगाडे,ग्रामपंचायत अधिकारी चंद्रकांत जगताप,उपसरपंच रेश्मा श्रवणकुमार जाधव,माजी सरपंच रामदास शिंगाडे,नारायण खराडे, शेळगाव बीट प्रमुख दादासाहेब डोईफोडे,ग्रामपंचायत सदस्य मोहन खराडे,स्वाती शिंगाडे,तात्यासो शिंगाडे,पोलीस पाटील उषा वाघमोडे, सोमनाथ सुपुते,अजय चवरे ग्रामपंचायत कर्मचारी सचिन शिंगाडे,दिपक पळसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.