
लोकशासन-गणेश गुप्ते ,प्रतिनिधी
भवानीनगर :(१९) सणसर ग्रामपंचायतीच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेच्या पूजनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी श्री.छत्रपती सहकारी कारखान्याचे संचालक रणजीत भैया निंबाळकर, यशवंत नरूटे पाटील, पिंटू गुप्ते, सणसर सोसायटीचे संचालक रणजीत भगत, रमेश दादा निंबाळकर, मोहन सुरूडकर, ग्रामसेवक सचिन पवार, यासीन भाई काझी ,अजित सोनवणे, दिलीप निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच दैनिक पुढारीचे पत्रकार रियाज सय्यद, सुनील लोंढे, दिपक चव्हाण, दीपक माने, अजित सोनवणे, राजाभाऊ जाधव, प्रकाश निंबाळकर, विक्रम निंबाळकर, भाऊ सोनवणे, प्रवीण शिंदे, भागवत अण्णा निंबाळकर, मोहन अण्णा धोत्रे, योगेश धोत्रे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमात शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शेवटी सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.