
लोकशासन-गणेश गुप्ते (प्रतिनिधी)
भवानीनगर:(२१) २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त इंदापूर तहसीलदार व तालुका पुरवठा विभाग व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम गोविंदराव पवार विद्यालय, भाग्यनगर-भवानीनगर येथे उत्साहात पार पडला.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिलावर तांबोळी, इंदापूर तालुका उपाध्यक्ष नानासो कदम, इंदापूर तालुका सचिव गणेश गुप्ते, तालुका कार्यकारिणी सदस्य गणेश जाधव, सदस्य पूनम गुप्ते, महिला सचिव इंदापूर तालुका नाजिया सय्यद, तसेच भवानीनगर अध्यक्ष मंगेश खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी दिलावर तांबोळी यांनी ग्राहकांनी दैनंदिन व्यवहारात कसे जागृत राहावे, आपल्या हक्कांची जाणीव कशी ठेवावी याबाबत मार्गदर्शन केले. ग्राहकांनी व्यवहार करताना सजग राहण्याची गरज अधोरेखित केली. बनावट ऑफर्स, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती व चुकीच्या बिलांविरोधात ग्राहकांनी आपले हक्क ठामपणे मांडावेत, असे आवाहन त्यांनी केले.
इंदापुर तालुका सचिव गणेश गुप्ते यांनी सायबर फ्रॉडच्या वाढत्या घटनांवर भाष्य करताना डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत सायबर फ्रॉडच्या विविध प्रकारांवर प्रकाश टाकत ऑनलाइन व्यवहार करताना पासवर्ड सुरक्षितता, ओटीपी गोपनीयता आणि संशयास्पद लिंक टाळण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक हक्क, जबाबदाऱ्या आणि सायबर सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.यावेळी गोविंदराव पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरे सर, बनसोडे मॅडम, आधी शिक्षक उपस्थित होते.