
लोकशासन-प्रतिनिधी: गणेश गुप्ते,भवानीनगर
बुधवार दि.०२ एप्रिल २०२५ रोजी उपप्रादेशिक परीवहन अधिकारी सुरेंद्र निकमस बारामती यांचे बरोबर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे दुपारी ३.०० वाजता अखिल भारतीय ग्राहक पंचायत, बारामती ,इंदापूर व दौंड तालुक्यातील सर्व पदाधिकारी व सदस्य यांची अँड.तुषार झेंडेपाटील , अध्यक्ष ,पुणे जिल्हा, दिलावर तांबोळी ,सदस्य ग्राहक संरक्षण परिषद, पुणे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली HSRP नंबर प्लेट,अवैध प्रवासी वाहतूक,सर्वर डाउन बाबत तसेच इतर विविध विषयांवर मिटींग आयोजित करण्यात आली होती.या विभागाशी निगडित समस्या व अडी अडचणीं बाबत समक्ष भेटून त्यावर उपाय योजनांबाबत विचार विनिमय करण्यात आले.यावेळेस HSRP नंबर प्लेट चे पुणे येथील एजन्सी प्रमुख उपस्थीतीत होते.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत इंदापुर तालुका कार्यकारिणी- राजेंद्र निंबाळकर अध्यक्ष, सचिन रणसिंग संघटक, शत्रुघ्न घाडगे सचिव, महेश पाटील उप अध्यक्ष,दादासाहेब भोंगळे कोषा अध्यक्ष, महेश सपकळ सह संघटक,गणेश गुप्ते सणसर अध्यक्ष, मंगेश खरात सचिव सणसर, अर्चना सपकळ महीला अध्यक्ष इंदापूर, पुनम गुप्ते संघटक इंदापूर, नाजिया सय्यद सचिव इंदापूर, अर्चना गोरे सदस्य,व तालुक्यातिल पद अधीकारी उपस्थीतीत होते.