इंदापूर तालुक्यातील या दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित ! पॉस प्रणाली व प्रत्यक्षात असलेल्या युरियासाठ्यात तफावत,अतिरिक्त युरिया विक्री आढळल्याने कारवाई

Spread the love

लोकशासन – प्रतिनिधी:इंदापुर ग्रामीण

इंदापुर : पॉस मशिन प्रणालीद्वारे प्रत्यक्षात युरियाची विक्री करूनही साठा अद्ययावत न करता तो जुनाच ठेवल्याने माहिती मिळण्यात तफावत दिसून आली. त्यामुळे अद्ययावत युरिया खतांचा साठा न केल्यामुळे तसेच एकाच शेतकऱ्याच्या नावे अतिरिक्त 20 ते 50 पोती युरिया विक्री दाखवणे यामुळे इंदापूर तालुक्यातील 2 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित विक्रेत्यांना निलंबन कालावधीत सर्व प्रकारच्या खत विक्रीस प्रतिबंध घालण्यात आलेला आहे.

तालुक्यातील युरिया खतपुरवठ्यावर परिणाम होऊ नये म्हणून जिल्ह्यातील विक्रेत्यांची दिनांक १ एप्रिलपासून युरिया खताचा पॉस मशिनवरील साठा व प्रत्यक्षात विक्री केंद्रात साठा, याची तपासणीची मोहीम कृषी विभागाने हाती घेतलेली आहे.या मोहिमेमध्ये सुमारे ३,००० मेट्रिक टन युरिया खताचा साठा पॉस प्रणालीवर जो उपलब्ध नव्हता, तो अद्यावत करण्यात आलेला आहे.यामुळे खरीप हंगामात खताची वस्तुनिष्ठ उपलब्धता व पुरवठा नियोजन करण्यास कृषी विभागास मदत होणार आहे.

तसेच निविष्ठा विक्रेत्यांना वेळोवेळी संधी देऊनही वेळेत कार्यवाही न केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी कळविले आहे.सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थिती मुळे खत टंचाई होऊ नये यासाठी कृषी सेवा केंद्र चालकांनी युरिया पॉस मशीनवरून विक्री करावी,शेतकरी यांना असलेल्या क्षेत्राच्या तुलनेतच युरिया, डीएपी खते विक्री करावीत, अतिरिक्त खत विक्री करू नये, साठेबाजी करू नये असे निर्देश कृषी विभागाद्वारे देण्यात आले आहेत.

या कृषी सेवा केंद्राचे परवाने करण्यात आले निलंबित

१) महेश फर्टिलायझर आगोती नंबर १

२) गणेश अॕग्रो एजन्सी-कळस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button