अमेरिकन विद्यार्थिनींकडून वालचंदनगरमध्ये इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-वालचंदनगर

वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापुर) येथील भारत चिल्ड्रन्स अकॅडमीमध्ये अमेरिकेतील University of Michigan मधील विद्यार्थिनींनी पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिराद्वारे विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग विषयाचे प्रत्यक्ष धडे दिले जाणार आहेत. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होण्यास मदत होईल.

या उपक्रमाची सुरुवात वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी Chirag Doshi यांच्या संकल्पनेतून २०१३ पासून करण्यात आली आहे. दरवर्षी मिशिगन विद्यापीठातील विद्यार्थी येथे येऊन विद्यार्थ्यांना विविध अभियांत्रिकी संकल्पनांचे प्रशिक्षण देणार आहेत.

यंदा मिशिगन विद्यापीठातील शिवानी अंगडी, कामाक्षी अटी, संजना दत्तला, जेड फ्रिडलिस, अर्मान कौर, फेथ मॅकइंटायर, डॅनिएला रानारियो, सिडनी शनाहान, व्हिक्टोरिया स्पेन्सर आणि भानुनी सुरेड्डी या विद्यार्थिनींनी शिबिरात सहभाग घेतला. या विद्यार्थिनींनी इयत्ता दहावी व बारावीतील सुमारे १२१ विद्यार्थ्यांना लेगो रोबोट्स, कृत्रिम बुद्धिमत्ता AI, Robotics प्रशिक्षण, स्टेट मशीन, क्लिनोमीटर, आयओई पॉप्युलेशन, क्रिप्टोग्राफी, बलून पॉवर्ड कार, सर्किट्स, आर्डुइनो, मोटर्स, मॉडेल डिस्टिलेशन, सोलर सेल, एआय इमेज जनरेशन, इन्ट्यूटिव्ह डिझाइन आणि आयोडीन क्लॉक रिअॕक्शन अशा विविध अभियांत्रिकी संकल्पनांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणार आहेत.

शिबिराचे आयोजन वालचंदनगर कंपनीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यासाठी फॅक्टरी मॅनेजर व्ही. व्ही. राजन, मानव संसाधन प्रमुख विनायक बुधवंत, शाळा समिती अध्यक्ष पंकज पवार व उपाध्यक्ष गणेश डोंबाळे व वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड च्या सर्व विभाग तसेच कर्मचाऱ्याचे सहकार्य लाभले. शाळेचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर, पर्यवेक्षक अमोल गोडसे, प्रेमा सिंह व प्रचना सांगळे यांनीही विशेष परिश्रम घेतले.

दरम्यान, परदेशी विद्यार्थिनींना भारतीय संस्कृतीचीही ओळख व्हावी या उद्देशाने त्यांना मेहंदी काढणे, रांगोळी रेखाटणे आणि साडी नेसणे यांसारख्या परंपरा शिकणार आहेत. तसेच भारत आणि अमेरिका यांच्या शिक्षणपद्धतीतील फरकांवर चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाबद्दलची आवड वाढीस लागली असून, जागतिक स्तरावरील शिक्षणाचा अनुभव मिळणार आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8007108688

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button