इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्याचे पाणी पूर्ण क्षमतेने पोहचविण्या बाबत जलसंपदा मंत्री यांचे तात्काळ आदेश

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर ग्रामीण

इंदापूर : इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना खडकवासला कालव्याचे पाणी पूर्ण दाबाने व नियमित स्वरूपात मिळावे, यासाठी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मा.श्री.प्रदीपदादा गारटकर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांना सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात इंदापूर तालुक्यातील शेती क्षेत्र, पाण्याची वाढती गरज तसेच कालव्याच्या शेवटच्या टप्प्यात पाणी पोहोचताना येणाऱ्या अडचणी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून पाणी वितरण व्यवस्था अधिक प्रभावी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या निवेदनाची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. खडकवासला कालव्याचे पाणी कोणत्याही अडथळ्याशिवाय व पूर्ण क्षमतेने इंदापूर तालुक्यातील शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचावे, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

या निर्णयामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, पिकांच्या सिंचनासाठी आवश्यक पाणी वेळेवर उपलब्ध होणार आहे.शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीला न्याय मिळावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button