प्रविण माने यांच्या वाढदिवसा निमित्त गोतोंडी येथील शाळेत शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर ग्रामीण

इंदापूर : भारतीय जनता पार्टीचे नेते व सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख प्रविण माने यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून इंदापूर तालुक्यातील गोतोंडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत संदीप माने परिवारा कडुन शालेय उपयोगी साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने यांचा १७ जुन रोजी वाढदिवस असून माने यांच्या वाढदिवसा निमित्त सामाजिक उपक्रम राबविण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम घेण्यात आल्याचे संदीप माने यांनी सांगीतले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना भाजप चे तालुकाध्यक्ष राजकुमार जठार यांनी संदीप माने यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत या शाळेसाठी भाजप व प्रविण माने यांच्या माध्यमातून वाॅटर फिल्टर देण्याची तयारी दाखवली.

यावेळी भाजप चे उपाध्यक्ष सत्यजीत रणवरे,युवक भाजप चे सरचिटणीस सचिन शेंडे,सामाजिक कार्यकर्ते संजय माने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संदीप येवले सर,अंगणवाडी शिक्षिका अनिता नवले व शुभांगी जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button