पंतप्रधान मोदींच्या तपपुर्ती निमित्त निमगाव केतकी येथे भाजप कडून करण्यात आली आरती

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर ग्रामीण

इंदापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळाची बारा वर्ष पूर्ण केल्याचे औचित्य साधून इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आरती करत पंतप्रधान मोदी यांच्या आरोग्य व पुढील वाटचालीसाठी परमेश्वराकडे साखडे घालत आरती करण्यात आली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारा वर्षाच्या तपपुरती कार्यकाळाचा आढावा घेऊन केलेल्या कामांची माहिती जनतेसमोर मांडण्यात आली.यावेळी भाजप प्रदेश सदस्य माऊली चवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाचा आढावा मांडत महाराष्ट्रात सुरू असलेल्या एस आय आर प्रक्रियेविषयी माहिती देऊन एस आय आर महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.तर भाजपचे इंदापूर तालुका अध्यक्ष राजकुमार जठार यांनी नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकाळात कलम 370 तिहेरी,तलाक,राम मंदिर यासारखे ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे सांगुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी आरोग्य लाभो असे साकडे घातले.

यावेळी भाजप चे महामंत्री सुरज पिसे,उपाध्यक्ष सत्यजीत रणवरे,उपाध्यक्ष संदीप माने, ओबिसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री संदीप आदलिंग,चंद्रकांत शेंडे,सचिन शेंडे,वैभव जाधव आदी मान्यवर उपस्थित होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button