इंदापूर तालुक्यातील डाळज येथील बोअरवेल हरवल…!

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर ग्रामीण

डाळज : इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर तीन मधील बोअरवेल सापडत नसल्याने बोअरवेल हरवले की काय अशी शंका उपस्थित होत आहे.डाळज नंबर तीन येथील शिंदे वस्तीवरती सन २०१२ ते २०१७ दरम्यान नागरिकांना पाण्याची सोय होण्याच्या उद्देशाने शासनाकडून पुणे जिल्हा परिषद पंचायत समितीत मधून हातपंप बसवण्यासाठी बोअरवेल घेण्यात आले मात्र ज्या कारणासाठी बोअरवेल घेण्यात आले ते बाजुलाच ठेवून या बोअरवेल वरती अनधिकृत मोटार बसवून पाण्याचा वापर शेतीसाठी केला जात असल्याची तक्रार येथील रहिवाशी छाया पांडुरंग शिंदे यांनी केली आहे.

डाळज नंबर तीन येथील या घटने संदर्भात छाया पांडुरंग शिंदे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व डाळज ग्रामपंचायती कडे वारंवार पाठपुरावा करून तक्रारी अर्ज देऊन देखील या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे शिंदे यांनी सांगीतले.

वास्तविक पाहता वाड्यावस्ती वरील लोकांच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी घेण्यात आलेल्या बोअरवेल वरती विद्युत मोटार टाकून ते पाणी शेतीसाठी वापरणे कितपत योग्य आहे याचा विचार करून बोअरवेल वरती हातपंप बसवून सर्वांसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक असताना ग्रामसेवक कोणतीहि कारवाई करत असल्याचे दिसत नाही.त्यामुळे वरीष्ठ पातळीवरील प्रशासनाने यामध्ये गांभीर्यपूर्वक लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अशी अपेक्षा शिंदे वस्तीवरील नागरिकांकडून केली जात आहे

www.lokshasan.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button