उत्साहपूर्ण वातावरणात विश्वासराव रणसिंग इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-वालचंदनगर

वालचंदनगर : इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग इंग्लिश मिडियम स्कूल कळंब ता.इंदापूर येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात संस्था उपाध्यक्ष प्रकाश कदम यांच्या हस्ते गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी चिमुकल्यांचे औक्षण करून, फुगे देत आणि आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले.

नवीन गणवेश, आकर्षक दप्तर आणि चेहऱ्यावर उत्साहाचे हास्य घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर फुलून गेला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा आकर्षक पद्धतीने सजविण्यात आली होती. शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचा पहिला दिवस आनंददायी आणि संस्मरणीय करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले.

आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या समाधानामुळे शाळेत चैतन्यमय वातावरण निर्माण झाले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश कदम,प्राचार्य डॉ. अशोक काळंगे,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग,उपप्राचार्य डॉ.प्रशांत शिंदे,स्कूल टीचर मिस.अश्विनी घुगरी,मिस. सुजाता निंबाळकर,मिस. प्राजक्ता अर्जुन यांच्यासह शिक्षकवृंद,मान्यवर आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button