
लोकशासन : प्रतिनिधी-पुणे ग्रामीण
पुणे : पुणे जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडले असून ठाकरे सेनेच्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर,बारामती,दौंड तालुक्यातील अनेक जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच अनेक कार्यकर्ते शिंदेसेनेत आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. या प्रवेशांबाबत अत्यंत गोपनीयता पाळली गेली असून लवकरच हा पक्ष प्रवेश होतील अशी खात्रीलायक माहीती आहे.
लोकशासनला मिळालेल्या खात्रीशीर वृत्तानुसार इंदापूर बारामती व दौंड तालुक्यातील अनेक पदाधिकारी शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणारा असून याबाबतीत मागील काही दिवसांपूर्वी नुकतेच ठाकरे सेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेले आमदार सचिन अहिर यांच्या माध्यमातून हा प्रवेश होणार असल्याचे समजते.
इंदापूर तालुक्यातील अनेक मातब्बर जिल्हा व तालुका पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. इंदापूर तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये शिंदे सोबत जाण्याची गेली अनेक दिवसांपासून चर्चा होत होती मात्र अखेर या पक्षप्रवेशाला मुहूर्त मिळाला असून शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख राहिलेल्या सचिन अहिर यांच्या माध्यमातून हा पक्ष प्रवेश होणार असल्याची खत्रीलायक माहिती मिळाली आहे
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 8007108688