मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर ग्रामीण

इंदापूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, इंदापूर तालुका यांच्या वतीने राधाई हॉल, एसबीआय बँकेसमोर, इंदापूर येथे आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेने यशस्वीरित्या संपन्न झाले.

या रक्तदान शिबिराला नागरिक, युवा कार्यकर्ते, महिला तसेच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला असून शेवटच्या आकडेवारीनुसार तब्बल २०१ बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. अनेक रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले. “रक्त आहे… राष्ट्रशक्ती!” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकार करत वाढदिवसाचा उत्सव सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

यावेळी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अत्यंत प्रेरणादायी ‘मन की बात’ कार्यक्रम सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे ऐकला. पंतप्रधानांनी मांडलेले राष्ट्रहित, सामाजिक सहभाग, जनजागृती आणि नागरिकांच्या कर्तव्यभावनेचे विचार उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने SIR (Special Intensive Revision) संदर्भात महत्त्वपूर्ण बैठकही आयोजित करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी, पडताळणी, जनजागृती आणि बूथस्तरीय नियोजन याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. SIR मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रदीप गारटकर व प्रविण माने यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसेच प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यासह इंदापूर तालुका महिला मोर्चाच्यावतीनेही इंदापूर येथील जोतिबा मंदिर इंदापूर या ठिकाणी १०० झाडांचे वृक्षारोपण केले आहे.या कार्यक्रम प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, जेष्ठनेते प्रदीपदादा गारटकर, युवा नेते प्रविणभैय्या माने, आकाश कांबळे, मयूर पाटील, माऊली चवरे, अभिजित तांबिले, गजानन वाकसे, तानाजी थोरात, सदानंद शिरदाळे, बाबासाहेब चवरे, दत्तात्रय शेंडे, मंडल अध्यक्ष राम आसबे, किरण गाणबोटे, राजकुमार जठार, तेजस देवकाते,जोतिराम कुर्डे, मयूर शिंदे, सचिन शिरसट, महिला मंडल अध्यक्ष माधुरी भराटे, योगिता यादव, सारिका पवार, रुपाली रणदिवे, अश्विनी अंकुश व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. व मुक्ताई ब्लड बँक इंदापूर, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक तसेच आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या प्रत्येक सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि संघटन बळकटीचा संदेश देणारा हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्यामुळे संस्मरणीय ठरला.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8007108688

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button