
लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर ग्रामीण
इंदापूर : पुणे जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे सेनेला मोठे खिंडार पडणार असल्याचे वृत्त मागील पाच सहा दिवसापूर्वीच लोकशासन मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते.
ठाकरे सेनेच्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर,बारामती,दौंड तालुक्यातील अनेक जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच अनेक कार्यकर्ते शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त अखेर खरे ठरले आहे.
इंदापूर,बारामती व दौंड तालुक्यातील इंदापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळे,जिल्हा समन्वयक भीमराव भोसले,तालुकाप्रमुख नितीन शिंदे,इंदापूर शहरप्रमुख मेजर महादेव सोमवंशी,तालुका समन्वयक अरुण पवार,सुधीर पाटील,उपविभागप्रमुख हेमंत भोसले,विभागप्रमुख अभिजीत तरंगे,प्रवीण देवकर,बंडू शेवाळे,सुदर्शन माने आदि पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.आमदार सचिन अहिर यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेच्या उपस्थित हा पक्ष प्रवेश झालाआहे.
दिनांक २६ जुलै रोजी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील या मोठ्या गटाने शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने जिल्ह्यातील शिंदेसेनेला बळ मिळणार आहे.
“लोकशाहीत प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ज्यांना वाटतं की त्यांचा मार्ग वेगळा आहे, त्यांनी त्यांच्या इच्छेने निर्णय घेतला आहे. पण शिवसेना ही एका किंवा दोन व्यक्तींमुळे बनलेली नाही, ती बाळासाहेबांच्या विचारांवर आणि लाखो निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या घामावर उभी आहे. जाणाऱ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, पण पक्ष पूर्ण ताकदीने आणि नव्या उत्साहाने पुढे जात राहील.
सुदर्शन रणवरे , शिवसेना तालुका संघटक इंदापूर ( ठाकरे गट )