गुरुपौर्णिमे निमित्त शिरसटवाडी मध्ये रक्तदानासह अनेक स्तुत्य उपक्रम साजरे

Spread the love

लोकशासन : प्रतिनिधी-इंदापूर ग्रामीण

इंदापूर : गुरुपौर्णिमे चे औचित्य साधून शिरसटवाडी (ता.इंदापूर) येथील कल्पवृक्ष कृषी विकास संस्थे च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिरसटवाडीतील अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले असून या शिबिरात मध्ये ११० बॉटल रक्ताचे संकलन करण्यात आले असून “मुक्ताई ब्लड बँक” च्या माध्यमातून रक्तदान शिबिर पार पडले.

दिनांक २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा असल्याने श्री स्वामी समर्थ मंडळ यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ पारायण आयोजित करण्यात आले होते.या पारायणा मध्ये गावातील स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असुन महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती तर संध्याकाळी सात वाजता ग्रामदैवत मारुती व स्वामी समर्थ महाराज यांच्या चरण पादुकांचे गाव प्रदक्षिणा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी श्रीराम भजनी मंडळ यांची चांगल्या प्रकारे साथ लाभली.गुरुपौर्णिमे निमित्त महाप्रसादाचे आयोजन मीनाक्षी गजानन बाबर ( पिंपरी ) यांनी केले होते.

यावेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन लालासाहेब पवार,सोमेश्वर डोंगरे, गणेश पवार, नानासाहेब रावण,राहुल जाधव, किरण भुजबळ, गणेश बाळासाहेब पवार, विकास कदम, तिकडे सतीश जाधव अजित पवार भरत माने होनाजी हगवणे दशरथ नागळे आदि मान्यवर उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8007108688

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Now Button