
लोकशासन- प्रतिनिधी : सत्यजीत रणवरे
छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक ७ एप्रिल २०२५ रोजी जाहीर होईल.राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे व प्रादेशिक सहसंचालक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी नीलिमा गायकवाड यांनी याची घोषणा केली असुन सभासद व इच्छुक उमेदवारांच्या प्रतीक्षा अखेर संपली असून कारखान्याची निवडणूक प्रक्रिया ७ एप्रिल २०२५ पासून सुरू होईल.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व स्वीकार करण्याची मुदत ७ एप्रिल २०२५ ते १५ एप्रिल २०२५ पर्यंत राहणार असून, एकुण २१ संचालका करीता हि निवडणूक होणार आहे.पात्र अपात्र उमेदवारांची यादी १६ एप्रिल २०२५ रोजी जाहीर होणार आहे. वैध झालेल्या नामनिर्देशन पत्रांची यादी १७ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता जाहीर केली जाणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १७ एप्रिल २०२५ ते ०२ मे २०२५ पर्यंत राहणार आहे.निवडणुक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांची यादी व चिन्ह वाटपाची दिनांक ०५ मे २०२५ रोजी होणार असून १८ मे २०२५ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार आहे.
निकाल
१९ मे २०२५ रोजी सकाळी ०९:०० वाजता मतमोजणी सुरू होणार असून मतमोजणी झाल्यानंतर मतमोजणीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.