
लोकशासन-प्रतिनिधी: गणेश गुप्ते,भवानीनगर
भवानीनगर: इंदापूर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात पार पडली.सणसर परिसरातील भाग्यनगर योद्धा ग्रुप व भाग्यनगर यांच्या वतीने पहाटे हनुमान मंदिरामध्ये अभिषेक,आरती करण्यात आली.दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला जेवढे मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित.संध्याकाळी भाग्यनगर गावामधून पालखीमध्ये हनुमंताची मूर्ती ठेवून गावामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली. रात्री नऊ वाजता हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेऊन आरती करण्यात आली.यावेळी मंगेश गुप्ते, दत्ता शिंदे, स्वप्निल भोसले,आबा कदम, अमोल कोकरे, दिलिप मोरे, नाना धुमाळ, पप्पू सोनार, गोट्या चव्हाण, विजय गुप्ते,साहिल कापसे, निलेश गायकवाड, अजित गायकवाड, बंटी गडदे,साईद तांबोळी, दत्तु गुप्ते,अशोक गायकवाड,दिपक कांबळे,रूपेश गायकवाड, माने महाराज आदी महिला ग्रामस्थ उपस्थित होते.