
लोकशासन-प्रतिनिधी: संजय शिंदे,इंदापूर ग्रामीण
ग्रामसुरक्षा दलाचे कार्य पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते वालचंदनगर पोलीस स्टेशन यांचे वतीने शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य ग्राम सुरक्षा दल मेळावा आयोजित केला होता वालचंद नगर पोलीस स्टेशन अंतर्गत ३९ गावे १३ वाड्या वस्त्या असे एकूण ५२ गावांमधील ग्रामसुरक्षा दल सदस्य २३३ जवानांची गाव पातळीवर निवड करून त्यांना गणेश बिरादार अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग तसेच डॉक्टर सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग यांचे हस्ते ग्रामसुरक्षा दलातील सदस्य यांना ड्रेस लाठी शिट्टी या साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच ३९ गावांमधील पोलीस पाटील या पैकी काही पोलीस पाटलांनी विशेष कामगिरी केलेली आहे त्यांना वालचंदनगर पोलीस स्टेशन कडून सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला पोलीस पाटील मारुती दत्तू रासकर राहणार निरवांगी विलास परब कणसे मानकरवाडी राजू गायकवाड चिखली सागर खरात तावशी उषा वाघमोडे शेळगाव पिनाली गायकवाड कर्दनवाडी रेश्मा प्रशांत नवसे जाचकवस्ती तसेच संदीप चिंचकर रणगांव पोलीस पाटील कळंब गावचे पोलीस पाटील करडे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रत्येक गावांमधील महिला दक्षता कमिटी स्थापन केल्याने काही महिलांच्या सामाजिक अडीअडचणी सोडवण्यासाठी विशेष कामगिरी केली आहे त्या महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे अश्विनी गणेश जाधव अध्यक्ष राणी अमोल थोरात मयुरी शरद जामदार बेलवाडी सोनाली महेश निंबाळकर गीतांजली पाटोळे योगिता जामदार जाचक वस्ती यांचाही सत्कार करण्यात आला आहे.
या वेळी रतिलाल चौधर पोलीस उपनिरीक्षक यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर ॲडव्होकेट सुप्रिया बर्गे यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर डॉक्टर सुदर्शन राठोड म्हणाले की ग्राम सुरक्षा दलाचे कार्य पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे सामाजिक बांधिलकीची भावना ठेवून अधिक अधिक युवकांनी ग्रामसुरक्षा दलात सहभागी व्हावे पोलिसांचे संख्या बळ विचारात घेता पोलीस सर्वच ठिकाणी जाऊ शकतील असे नाही त्यामुळे मदतीसाठी ग्रामसुरक्षा दलातील जवान असणे गरजेचे बनले आहे ग्रामसुरक्षा दलातील जवानांनी चांगले काम केले तर पोलीस स्टेशन कडून सन्मान होत असतो त्याचा फायदा पोलीस भरतीसाठी होत असतो आपल्याला एक शिस्त वेगळीच लागते त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार म्हणाले की ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना प्रशिक्षण द्या म्हणजे कसे बोलावे कसे राहावे ड्रेस लाठी शिट्टी चा वापर चांगल्या कामासाठी करा रात्रगस्त पालखी सोहळा गणपती बंदोबस्त गावची जत्रा या ठिकाणी आपण पोलिसांना मदत करावी गावामध्ये बाहेरून येणारी वाहने संशयित व्यक्ती यांची विचारपूस केली पाहिजे काही संशयत दिसल्यास पोलिसांना तात्काळ फोन करून माहिती सांगितली पाहिजे आपण रात्रगस्त सतर्कपणे करत जावा आपण सतर्क ड्युटी केली तर चोरांचे प्रमाण गरफोडीचे प्रमाण होणार नाही तसेच ज्या ग्रामसुरक्षा दलातील जवान यांनी विशेष कामगिरी केली की त्यांचा सन्मान पोलीस स्टेशन येथे केला जाईल तसेच ग्राम सुरक्षा दलामध्ये कर्तव्य बजावत असताना जे युवक यांना पोलीस भरती सैनिक भरती व इतर शासकीय नोकरीसाठी फायदा होईल असेही सांगितले.यावेळी आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी मानले यावेळी मिलिंद मिठ्ठापल्ली पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर पोलीस स्टाफ ग्रामसुरक्षा दलातील सदस्य महिला दक्षता समिती पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होता.