
लोकशासन-प्रतिनिधी: शंकर जोग,पुणे
पुणे : ससून बै,जी,शा, वैद्यकीय महाविद्यालय तृतीय श्रेणी कर्मचारी सह, पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक सन २०२५-३० कालावधीसाठी निवडणूक जाहीर झाली होती.
या निवडणुकीमध्ये प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार बहुमतांनी निवडून आले.
सर्वसाधारण गटामध्ये उमेश बळवंत आचार्य, विलास सदाशिव कवडे, अनिल धोंडीराम गायकवाड, शशिकांत दगडू चव्हाण, प्रमोद मोतीलाल निनारीया, अनुसूचित जाती गटामध्ये स्वप्निल माणिक ठोकळे, सुनिता दत्तात्रय होले, भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागासप्रवर्ग हेमंत विजय चौगुले, या उमेदवारांनी विजय मिळविला. व महिला राखीव गटात मनीषा शरद भुजबळ, व विजया दत्तात्रेय हरपळे यांची बिनविरोध निवड झाली.
प्रगती पॅनलचे पॅनल प्रमुख विलास सदाशिव कवडे, प्रज्ञा गायकवाड यांचा पॅनल चा विजयात सिंहाचा वाटा होता, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रमाकांत बनाईत यांनी काम पाहिले.