
लोकशासन- प्रतिनिधी : बारामती
छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून दिनांक १५ एप्रिल अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती.शेवटच्या दिवसा अखेर एकुण ६०० नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली असुन शेवटच्या दिवशी जवळपास २६१ नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आली आहेत.
आज दिनांक १६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून आज किती अर्ज वैध ठरणार हे दुपार पर्यंत स्पष्ट होईल.त्यामुळे आजच्या नामनीर्देशन पत्र छाननी कडे सभासदांचे लक्ष लागून राहिले असुन आज बऱ्यापैकी निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार असून अनेक राजकीय दिग्गजांची मांदियाळी छाननी साठी बारामती येथील प्रांत कार्यालयात दिसून आली.