
लोकशासन- प्रतिनिधी : गणेश गुप्ते
राज्य शासनाकडुन नोंदणी व मुद्रांक विभागातील हाताळणी शुल्लकात वाढ करण्यात आली असल्याचे परिपत्रक महसूल व वन विभाग यांनी १५ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाचे सह सचिव सत्यनारायण बजाज यांनी काढले आहे.
या अगोदर सन २००१ साली नोंदणी व मुद्रांक विभागाने बांधा, वापरा, आणि हस्तांतर करा या तत्त्वावरती खाजगीकरणाच्या माध्यमातून संगणीकरण करणे, खाजगीकरणाच्या माध्यमातून येणारा खर्च भागवण्याकरता दस्त हाताळणी शुल्क म्हणून प्रतिपान वीस रुपये एवढी आकारण्यास मान्यता देण्यात आली होती . मात्र आतापर्यंत या शुल्का मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता.
मात्र नोंदणी विभागाचे संगणीकरण झाल्याने दस्त हाताळणी शुल्काची रक्कम नोंदणी विभागाच्या स्वीय प्रपंजी लेख्यामध्ये जमा होत आहे.स्वीय प्रपंजी लेख्यामध्ये जमा होणाऱ्या रकमेतून नोंदणी विभागाच्या संगणीकरणा वरील खर्च भागवण्यात येतो .सन-२००२ पासुन संगणकृत दस्त नोंदणी प्रणाली (सरिता) बांधा, वापरा, हस्तांतर करा या तत्त्वावर कार्यान्वित होती .
सध्या स्थितीत विभागाच्या निरनिराळ्या कामकाजाकरिता एकूण -३५ प्रणाली कार्यान्वित आहेत.त्यामुळे निरनिराळ्या प्रणालीचे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट व देखभाल खर्चामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
सन-२००२ मध्ये कार्यान्वित केलेली संगणकप्रणाली एकटे उभा रहा अशा पद्धतीची होती.सन-२०१२ साली यामध्ये नोंदणी विभागाने वेब आधारित प्रणाली कार्यान्वित केली.त्यासाठी डाटा सेंटर ,सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चर ची आवश्यकता असल्याने संगणीकरण खर्चामध्ये पूर्वीच्या तुलनेत वाढ झाली आहे. नोंदणी विभागाच्या डाटामध्ये (माहितीमध्ये) सातत्याने वाढ होत असून डाटा सेंटर ,सर्व्हर इन्फ्रास्ट्रक्चर च्या खर्चामध्ये भविष्यातही वाढ अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे वेब आधारित प्रणाली करिता स्वतंत्र व कार्यक्षम नेटवर्क आवश्यक असल्याने डाटा सेंटर व विभागातील सर्व कार्यालयांना समर्पित एमपीएलएस कनेक्टिव्हिटी सन-२०१२ पासुन पुरविण्यात आलेली आहे.
त्यामुळे सन-२०१२ पासुन नेटवर्क या बाबीवरील वाढीव खर्चाचा समावेश संगणकीय करणाच्या खर्चामध्ये झालेला आहे.यामुळे नोंदणी व मुद्रांक विभागास बांधा, वापरा,हस्तांतर या तत्त्वावर खाजगीकरणाच्या माध्यमातून संगणीकरण करणे , संगणीकरण अंतर्गत येणाऱ्या हार्डवेअर ,सॉफ्टवेअर,कं झ्यूमेबल्स, मनुष्यबळ यांच्या दरात त्याचप्रमाणे स्वीय प्रपंजी लेख्यामध्ये खर्च करावयाच्या बाबी मध्ये वाढ झालेली असल्याने नोंदणी व मुद्राक विभागातील खाजगीकरणाच्या माध्यमातून येणारा खर्च भागविण्याकरता दस्त हाताळणी शुल्क २०/-रुपये वरून ४०/-करण्यात आली आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशावरून महाराष्ट्र शासनाचे सह सचिव सत्यनारायण बजाज यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक काढण्यात आलेले आहे.