
!! दंडेलशाही ला कंटाळून पुर्वीच्या मुख्याध्यापकाला द्यावा लागला आपल्या पदाचा राजीनामा !!
लोकशासन- प्रतिनिधी : यवतमाळ
संस्था चालक व मुख्याध्यापका कडून वारंवार होत असलेल्या मानसिक जाचाला कंटाळून शाळेतील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना आत्महत्या करण्याची परवानगी मिळावी म्हणून निवेदन केले आहे.यवतमाळ येथील बाभुळगाव तालुक्यातील मांगुरटाकळगाव येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रम शाळे मध्ये कामठी या पदावर ज्ञानेश्वर जनार्दन उबाळे हे १९९९ पासून या शाळेत कार्यरत आहेत.सुरुवातीला पहुर या गावात हि संस्था असताना उबाळे यांनी २४ तास निवासी म्हणून शाळेत काम पाहिले तर नंतर या शाळेचे पुनर्वसन मांगुरटाकळगाव येथे झाल्यानंतर त्या ठिकाणी उबाळे कार्यरत झाले.
सन २००७-०८ पासून शाळेचे मुख्याध्यापक उमेश जाधव व संस्था चालक सुनिल काळे हे सदरील संस्थेतील ज्ञानेश्वर उबाळे व इतर सहा कर्मचाऱ्यांना वारंवार मानसिक त्रास देत असुन उबाळे यांनी मागील काळात या प्रकरणी मानसिक त्रास व मारझोड केली असल्याची बाभुळगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती.तर तत्कालीन मुख्याध्यापक संजय बडवाई यांना संस्था चालक सुनिल काळे यांनी उबाळे यांच्यासह सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याच्या दबाव आणला होत्या त्या दबावाला बळी पडून तत्कालीन मुख्याध्यापक संजय बडवाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
संस्था चालक व मुख्याध्यापका कडून वारंवार होत असलेल्या मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रासाला कंटाळून मला आत्महत्या करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी ज्ञानेश्वर उबाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.