
लोकशासन- प्रतिनिधी : गणेश गुप्ते,भवानीनगर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एम पी एस सी) घेण्यात आलेल्या परीक्षेतून इंदापूर तालुक्यातील कन्या बेलवाडी गावची रहिवासी कुमारी कल्याणी रामचंद्र खुटाळे हिची महसूल सहाय्यक या पदासाठी निवड झाली आहे. कल्याणीचे प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथीपर्यंत थोरातवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झाले. तसेच पाचवी ते दहावीचे शिक्षण इंदापूर तालुक्यातीलच श्री छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी येथे झाले .व त्यानंतर अकरावी व बारावीचे शिक्षण तिने वालचंदनगर येथील वर्धमान विद्यालय येथे घेतले. व तिचे पुढील शिक्षण बारामती तालुक्यातील माळेगाव येथे घेतले.
त्यानंतर एमपीएससी चा अभ्यास करण्यासाठी पुणे येथे गेली चार वर्षे ती शिक्षण घेत आहे व आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या एमपीएससी परीक्षेतून महसूल सहाय्यक पदी तिची निवड झाली आहे. अतिशय गरिबीच्या परिस्थितीतून तिच्या वडिलांनी म्हणजे रामचंद्र सखाराम खुटाळे यांनी खूप परिश्रम घेऊन तिला शिक्षण दिले. रामचंद्र खुटाळे यांचा बांगड्या भरण्याचा व्यवसाय आहे. या व्यवसायातूनच चार पैसे बाजूला टाकून मुलीला उच्चशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. ध्येय समोर असेल तर कोणतीही परिस्थिती तुम्हाला तुमच्या ध्येयापासून लांब ठेवू शकत नाही तसेच जिद्द आणि चिकाटी मेहनत कष्ट करायची इच्छा , आणि अभ्यासात सातत्य असेल तर यशापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही.
कल्याणी रामचंद्र खुटाळे हिने अतिशय कठोर मेहनत चिकाटी आणि सातत्य यांच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. आणि एवढ्या वरतीच न राहता तिला क्लासवन अधिकारी बनण्याचे स्वप्न ती उराशी बाळगून आहे. आई वडील शिक्षक वृंद आणि मोठा मित्र परिवार व सर्वात महत्त्वाचे म्हणजे माळेगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेज ची चार वर्षे व पुणे येथील एमपीएससी परीक्षेसाठी सराव व राहणे चा संपूर्ण खर्च व मानसिक आधार व सर्वच सपोर्ट सिस्टीम मोलाची मदत व मार्गदर्शन केले तो तिचा मोठा भाऊ विकास खुटाळे याचा तिच्या यशात सर्वात महत्त्वाचा मोठा वाटा असल्याचे तिने सांगितले. तिच्या या निवडीबद्दल बेलवाडी येथील जय श्रीराम प्रतिष्ठानचे श्रीराम मित्र मंडळ, श्री ब्रह्मचैतन्य जप संकुल शाखा बेलवाडी, हिंदुस्तान प्रतिष्ठान बेलवाडी , नव संजीवन सोशल ट्रस्ट ,शिवसेना इंदापूर तालुका, महिला बचत गट, व व्यक्तिशः नेचर डिलाईट डेअरी परिवाराचे अध्यक्ष अर्जुन देसाई साहेब राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अँड शुभम निंबाळकर, राजवीर दूध डेअरीचे चेअरमन कीर्ती कुमार जामदार, शिवसेनेचे इंदापूर तालुकाप्रमुख रामचंद्र जामदार, सहकार सेनेचे इंदापूर तालुकाप्रमुख अनिल कदम, बेलवाडी चे माजी सरपंच माणिक जामदार , सामाजिक कार्यकर्ते प्रकाश खैरे पाटील ,नानासाहेब पवार , हनुमंत जाधव दादासो यादव प्रकाश शेळके, त्याचबरोबर बेलवाडीतील स्थानिक कार्यकर्ते गणेश मोहोळकर अमोल शिर्के पोलीस कॉन्स्टेबल सागर जामदार, कृष्णा जाधव आदी पदाधिकारी ग्रामस्थांनी कल्याणी व तिचे वडील रामचंद्र सखाराम खुटाळे यांचे अभिनंदन करून कल्याणीस पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. व लवकरच बेलवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने तिचा सत्कार घेण्याचं नियोजन सुरू असल्याची माहिती मयुरेश्वर बेकरीचे सर्वेसर्वा अमोल शिर्के यांनी दिली.