
लोकशासन- प्रतिनिधी:महेश झिटे,श्रीगोंदा ग्रामीण
पेडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हा चेअरमन निवड करण्यात आली असून विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन पदी शहाजी खेडकर यांची निवड करण्यात आली पेडगाव सोसायटीच्या इतिहासातील सर्वात कमी वयात व्हॉईस चेअरमन म्हणून निलेश झिटे यांची निवड करण्यात आली सहा एप्रिल रोजी पार पडलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीतमहाराष्ट्र राज्य प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष श्री. प्रशांत भैय्या ओगले,, मा.उपसभापती गणेश झिटे, मा.व्हा.चेरमन सुनील खेडकर, श्री. नानासाहेब झिटे यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ कीसान क्रांती पॅनलला १३ पैकी १० जागा मिळवून दणदणीत विजय संपादन करण्यात यश मिळाले होते.
दिनांक १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता चेअरमन व्हा चेअरमन निवड प्रक्रिया पार पडली या निवडी वेळी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत भैय्या ओगले, मा.उपसभापती श्री गणेश झिटे, मा.व्हा.चेअरमन श्री सुनील खेडकर, नानासाहेब झिटे, पप्पू कोथंबिरे,श्री. भाऊसाहेब झिटे, सुनील नवले, हरिदास नवले, दादा काटकर, मुबारक शेख, दत्ता जंजिरे, सचिन झिटे, नारायण गोधडे,गोरख झिटे, संदीप मोहिते, सूरज शेख, नूतन संचालक, श्री भगवान कणसे, शहाजी खेडकर, निलेश झिटे, अशोक पवार, शरद झिटे, मनोहर खेडकर, निलेश शिरसागर, श्रीमती शालन नवले, विशाल कानडे, पोपट गावडे , यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.