
लोकशासन- प्रतिनिधी : भवानीनगर
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीत रंगत निर्माण झाली असून गेली दहा वर्षांपासून संचालक होण्याची इच्छा बाळगून असलेल्या अनेक मातब्बर मंडळीचे या निवडणुक प्रक्रिये कडे लक्ष लागून राहिले आहे.
छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा होती.मात्र कारखान्याच्या निवडणुकीसाठी तब्बल सहाशे उमेदवारी अर्ज दाखल झाले.यापैकी जवळपास ११५ उमेदवारी अर्ज छाननी मध्ये बाद झाले असून यापैकी काही ठिकाणी एकाच व्यक्तीचे दोन किंवा तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.तर दाखल झालेल्या अर्जां पैकी ३८५ अर्ज वैध ठरले आहेत.
छत्रपती सहकारी साखर कारखान्या वरती अनेकांचे प्रपंच चालत असुन कारखाना टिकला पाहिजे या उद्देशाने काही कठोर निर्णय घेणे आवश्यक असुन अजित पवार यांनी विद्यमान संचालक व कारखान्याचे ऊस वाहतूकदार, ट्रॅक्टर मालक तसेच कारखान्या सोबत आर्थिक व्यवहार असणाऱ्यांना संचालक पदापासून दूर ठेवण्यचे संकेत दिले आहेत.उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत २ में पर्यंत असुन २४ एप्रिलला सकाळी ०९ ते दुपारी ०३ या वेळेत छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदासाठी उमेदवारांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रिडा मंत्री आमदार दत्तात्रय भरणे व राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक घेणार असून यानंतर कारखान्याच्या निवडणुकीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होईल.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रिडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत २४ एप्रिल रोजी होणार असून.या दिवशी सकाळी ०९:०० ते १०:०० यावेळेत गुणवडी गट नंबर ६ साठी मुलाखत होईल,१०:०० ते ११:०० सोनगाव गट नंबर ५ साठी,११:०० ते १२:०० लासुर्णे गट नंबर १ साठी, दुपारी १२:०० ते ०१:०० सणसर गट नंबर २ साठी दुपारी ०२ ते ०३ उध्दट गट नंबर ३ साठी तर दुपारी ०३:०० ते ०४:०० आंथुर्णे गट नंबर ४ साठी सदरील मुलाखती घेतल्या जाणार आहेत.