
लोकशासन- प्रतिनिधी : गणेश गुप्ते,इंदापूर तालुका
जम्मू काश्मीर राज्यातील पेहेलगाम येथे दहशतवादी हल्लायात महाराष्ट्र राज्यातील जखमी झालेल्या व्यक्तींना व मृत पावलेल्या व व्यक्तींच्या वारसास आर्थिक मदत देण्याबाबत शासनाच्या महसूल व वन विभागाने निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील संतोष जगदाळे – पुणे ,कौस्तुभ गणबोटे – पुणे, संजय लेले – डोंबिवली, हेमंत जोशी – डोंबिवली, अतुल मोने – डोंबिवली, दिलीप डिसले – पनवेल, यांचा मृत्यू झाला आहे तर सात व्यक्ती जखमी झाल्या आहेत हे पर्यटक जम्मू काश्मीर राज्यातील पेहेलगाम येथे पर्यटनासाठी दि.(२२) रोजी गेले होते.पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी व मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसास आर्थिक मदत शासनाने जाहीर केली आहे.
यामध्ये महाराष्ट्र राज्यातील ७ व्यक्ती जखमी झालेले आहेत. व ६ मृत पावलेले आहेत.मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख व जखमी झालेल्या ६ व्यक्तींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये असे मंजूर करण्यात आले आहे.असा शासन निर्णय दि.(२३) रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार महाराष्ट्राचे सहसचिव कैलास अर्जुन गायकवाड यांनी शासन परिपत्रक जारी केले आहे.