
लोकशासन- प्रतिनिधी गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर ते शेटफळकडे रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून. हा रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून अर्धवट स्वरूपात आहे. आज दि(३०) रोजी रात्री ९वा.इंदापूर -बारामती रस्त्यालगत असणाऱ्या गायकवाड वस्तीनजीक एक मोटरसायकल स्वार याच रस्त्याच्यालगत असणाऱ्या मोठ्या खड्ड्यामध्ये पडला. सुदैवाने तो किरकोळ जखमी झालात्याला तातडीने स्थानिक ग्रामस्थांनी खड्ड्याच्या बाहेर काढले. थेट हॉस्पिटल ला नेले असी माहिती घटनास्थळारील वाहन चालकांनी दिली.
मात्र गेल्या अनेक वर्षापासून या ”रस्त्याचे घोंगडे भिजत पडले” असून याच पद्धतीने भवानीनगर कॉलनी ते निंबोडी या रस्त्याची एकच बाजू पूर्ण करण्यात आलेली आहे त्या बाजूला देखील मोठमोठे (स्टिल) गज आडवे आणि उभे आहेत ते ही अर्धवट स्वरूपात त्यामुळे भवानीनगर, भाग्यनगर, अशोकनगर, भोईटे वस्ती, निंबोडी येथील वाहनचालकांना रोजच दळणवळणासाठी हा रस्ता महत्त्वाचा मानला जातो. सध्या या भागातील अनेक वाहनचालक पर्यायी रस्ता म्हणून छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा रस्ता वापरत आहेत.
तसेच अशा रोजच घटना घडत आहेत. मात्र जीव गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का? म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो अशी प्रतिक्रिया घटनास्थळावरील वाहनचालकांनी दिली हा रस्ता त्वरित करण्यात यावा अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.