
लोकशासन- प्रतिनिधी : शंकर जोग,पुणे
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियन पुणे महानगरपालिकेमधील ठेकेदारी व रोजंदारीवरील सफाई कर्मचारी यांना पुणे मनपा सेवेत कायम करण्याबाबत 2012 पासून प्रलंबित असलेल्या प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत आहे याबाबत आज युनियनच्या वतीने पुणे महानगरपालिकेतील मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे व उप आयुक्त सामान्य प्रशासन विभाग पुणे महानगरपालिका प्रतिभा पाटील यांच्याशी या संदर्भातील चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रश्नांची उत्तरे न देता उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याने युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले, न्यायालय कडून आदेश आल्यानंतरही त्याचे पालन केले जात नसल्याने, आठ आठवड्यात सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही दिरंगाई केली जात आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी एक मे पासून पुणे महानगरपालिका प्रवेशद्वारा समोर तीव्र आंदोलनास सुरुवात केली जाणार आहे.असे महानगरपालिका आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनात डॉ सुधाकर पणी कर, एडवोकेट रशीद सिद्दिकी, एडवोकेट नितीन नगरकर, परविन लालबिगे, प्रदेश सचिव रवी भिंगानिया, अध्यक्ष धर्मेंद्र सडेकर,, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माने, सचिव रवी बेंगळे, सूर्यकांत यादव, बाबा गोणेवार, विकास कुचेकर, अजित मापारे, तेजस्विनी सडेकर, प्राची खटावकर, रत्नाताई काळे, यांनी निवेदनाद्वारे माहिती दिली.