
लोकशासन- प्रतिनिधी : गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
दिनांक २९ एप्रिल वेळ संध्याकाळ ६ ची अचानक कोणतरी येते आणि विचारते तुमच्याकडून रेशनिंग चे पैसे घेतले जातात का, धान्य व्यवस्थित दिले जाते का, रेशन दुकान संध्याकाळी आणि सकाळी उघडे असते का , धान्याचा साठा किती शिल्लक आहे . अजून किती रेशन कार्ड धारकांना धान्य देणे बाकी आहे.असे प्रश्न रेशन दुकानदार व रेशन धारकांना थेट विचारले जाते त्यामध्येच रेशन कार्ड धारकांमध्ये कुजबूज चालू होते आणि हे गृहस्थ आहेत तरी कोण असा प्रश्न रेशन दुकानात आलेल्या रेशन धारकांना पडतो.
हेच गृहस्थ इंदापूर तालुक्याचे पुरवठा अधिकारी सपन गडवणर असल्याचे रेशन धारकांना समजते. आज इंदापूर तालुक्यामध्ये भिगवन, अकोले, कळस, निंबोडी, लाकडी, या भागामध्ये इंदापूर पुरवठा अधिकारी सपन गडवणर यांनी अचानक भेटी दिल्या. आणि ग्रामीण भागामध्ये खऱ्या अडचणी काय आहेत या ग्राउंड लेव्हल वरती जाणून घेतल्या. अनेक शिधापत्रिका धारकांनी देखील भवानीनगर येथील १६ गावांमधील अनेक रेशन कार्डधारक आहेत व त्यांचे रेशन कार्ड ऑनलाइन झालेले नाहीत. अशांच्या देखील अडचणी समजून घेऊन यावरती काय करावे लागेल याबाबत देखील रेशन धारकांशी चर्चा केली.
‘‘अधिकारी असावेत तर असे’ अशी प्रतिक्रिया रेशन कार्डधारकांनी त्या ठिकाणी दिली.इंदापूर तालुक्यामध्ये लाखो रेशन कार्डधारक असून यामध्ये विवाह झालेल्यांचे महिलांचे नाव कमी करणे, मयत व्यक्तीचे नाव कमी करणे, नवीन नावे जोडण्याबाबत, रेशन कार्ड केवायसी बाबत माहिती देण्यात आली.याबाबतच जलद गतीने कसे कामकाज होईल याकडे लक्ष देण्याच्या सूचना देखील पुरवठा अधिकारी यांनी दिल्या.
भवानीनगर ते इंदापूर ४० कि.मी. असून रोजंदारी बुडवून इंदापूर तहसील कचेरी मध्ये जावे लागत असते. मात्र या वरती देखील पुरवठा अधिकारी यांनी रेशन कार्ड संदर्भातल्या अडचणी जाणून घेतल्या व त्यावर ती काय करता येईल रेशन कार्ड संदर्भात जलद गतीने काम करू असे इंदापूर तालुक्याचे पुरवठा अधिकारी सपन गडवणर यांनी सांगितले यावेळी, योगेश पाटोळे, भवानीनगर रेशन दुकानदार अंकुश जगताप, कुंदन वाघ, राहुल थोरात,आदी रेशनकार्ड धारक उपस्थित होते.