
लोकशासन- प्रतिनिधी:गणेश गुप्ते, इंदापूर ग्रामीण
आपल्या देशामध्ये कोट्यावधी ग्राहकांचे कोणत्या ना कोणत्या बँकेमध्ये खाते असते आणि याच खात्याचे एटीएम कार्ड ग्राहकाकडे असते मात्र ग्राहक फक्त पैसे काढण्यासाठी याचा वापर करत असतात.
मात्र एटीएम कार्ड सोबत विम्याचे कवच असते हे अनेक ग्राहकांना माहीतच नसल्याचे ग्राहकांसोबत लोकशासन चे प्रतिनिधी यांनी चर्चा केल्यानंतर समजले.
याबाबत बँकांनी फक्त विमा उतरून न घेता ग्राहकांमध्ये जनजागृती करावी अशी मागणी बँक ग्राहकांमधून होत आहे.एटीएम कार्डधारकांना त्यांच्या एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड सोबत त्यांना एटीएम कार्ड अपघात विमा आणि एटीएम कार्ड जीवन विमा मिळतो. मात्र अनेक ग्राहक एटीएम सोबत असलेले पुस्तक वाचतच नाहीत अशी बाब समोर आलेली आहे. त्यातच अनेक ग्रामीण भागामध्ये अशिक्षित लोकांचे प्रमाण जास्त आहे.मात्र बँकांकडून हे विमे उतरवले जातात त्याची रक्कम ही खात्यामधून कट केली जाते मात्र खाते काढत असताना अशा कोणत्याही प्रकारची माहिती ग्राहकाला मिळत नाही अशी माहिती अनेक ग्राहकांनी दिली. वेगवेगळ्या एटीएम कार्ड्स ना वेगवेगळ्या रकमेच्या विम्याच्ये संरक्षण मिळते .भारतीय स्टेट बँकेच्या मास्टर कार्डवर किंवा व्हिजा कार्डवर ग्राहकाला वीस लाखापर्यंत विम्याचे संरक्षण मिळते.
ज्या ग्राहकाकडे बँकेचे क्लासिक कार्ड असेल तर एक लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळते. ज्या ग्राहकाकडे प्लॅटिनम कार्ड आहे त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळते. मास्टर कार्ड असेल तर पन्नास हजार रुपये मास्टर कार्ड आणि व्हिजा कार्ड धारक हे दोन्ही कार्ड एकत्रित असतील तर पाच लाखाचा विमा मिळतो. याचबरोबर प्रधानमंत्री जनधन योजनेच्या अंतर्गत ग्राहकांना एक लाखापासून ते दोन लाखापर्यंत विमा संरक्षण भेटते.कार्डधारकाचा अपघाती मृत्यू किंवा अपघातामध्ये जखमी झाल्यास बँकेत जाऊन विम्याचा दावा करावा लागतो.यामध्ये एका हाताने किंवा पायाने अपंग झाल्यास पन्नास हजार रुपये तर दोन्ही हात पाय गमावल्यास एक लाख रुपयाचा विमा त्या ग्राहकाला मिळतो. यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्याकडे असलेल्या कार्डवर विम्याचे संरक्षण अवलंबून असते. यामध्ये अपघाताच्या ४५ ते ९० दिवसांमध्ये कार्डद्वारे आर्थिक व्यवहार केलेले असतील तर ग्राहक या विमा साठी पात्र ठरतात.
यासाठी स्वतः कार्डधारक किंवा वारसदार यांनी संबंधित बँकेत जाऊन अर्ज करावा लागतो. दुर्घटना घडल्यावर तात्काळ बँकेला माहिती द्यावी लागते. त्या अर्जासोबत कार्डधारकाचा मृत्यूचा दाखला जखमी असल्यास संबंधित हॉस्पिटलची बिले, औषधांची बिले, बँकेचे पासबुक, आधी कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतात. आरबीआयच्या नियमानुसार बँका आपल्या ग्राहकाला सुविधा देत असतात मात्र कार्डधारकांना किती रुपयापर्यंत विम्याचे संरक्षण द्यावे याबाबत काही ठोस नियम नसल्याने प्रत्येक बँकांचे धोरण किंवा नियम हे वेगवेगळे असतात. यामध्ये अपघाताच्या तारखेपासून 30 ते 60 दिवसांपूर्वी कार्ड द्वारे दोन ते सहा वेळा आर्थिक व्यवहार झाल्याची अट आहे.ही अट संबंधित बँक आणि क्लेमच्या आकड्या वर अवलंबून आहे.
एटीएम कार्ड धारकाचा अपघातात मृत्यू झाल्यास त्याच्या निधनानंतर महिन्याभराच्या आत संबंधित बँकेशी संपर्क करून आवश्यक कागदपत्रे जमा करणे गरजेचे असते.मात्र बँकांकडून बँक ग्राहकांना माहितीच मिळत नसल्याने बँकांनी याबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत बँक ग्राहकांनी व्यक्त केली आहे.