
लोकशासन- प्रतिनिधी:शंकर जोग,पुणे
पुण्यातील वाढते वाहतूक प्रमाण, बेशिस्त वाहनचालक आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेत पुणे शहर वाहतूक विभाग आणि पुणे सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने “रस्ता सुरक्षा अभियान” कार्यक्रम नुकताच शिमला ऑफिस चौक येथे राबवण्यात आला.
या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याची जाणीव निर्माण करणे आणि सुरक्षित वाहतुकीस प्रोत्साहन देणे हा होता. कार्यक्रमामध्ये विविध मार्गांनी जनजागृती करण्यात आली, ज्यात हातात फलक घेऊन संदेश देणे, वाहनचालकांशी थेट संवाद साधणे यांचा समावेश होता.
या उपक्रमामध्ये अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील (IPS), पोलिस उपायुक्त (वाहतूक विभाग) अमोल झेंडे,INS TV NEWS CHANNEL चे पुणे प्रतिनिधी राकेश छाजेड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बालकोटगी आणि नीता राजदान कौल रोटरी क्लब ऑफ कल्याणी नगर पुणे, राजेंद्र कपोते पोलिस मित्र संघटना यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
“रस्ता सुरक्षा अभियान” अंतर्गत अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होऊन सुरक्षित वाहतूक संस्कृती बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.