
लोकशासन- प्रतिनिधी:मयुर माने,अकलूज
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांची बैठक महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक ०९ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता “प्रतापगड” धवलनगर-अकलूज येथे आयोजित करण्यात आहे.
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या सर्व आघाडीचे राज्य, जिल्हा, तालुका, ग्रामशाखा सह सर्व पदाधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात असून या बैठकी मध्ये जनसेवा संघटना पदाधिकारी निवडी व जनसेवा संघटना बांधणी बाबत विचार विनिमय करणे यासह अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकी मध्ये संघटनेच्या नियुक्त्या, नवीन ध्येय धोरणे, भविष्यातील वाटचाल व संघटना बांधणी बाबत विचार विनिमय करणे यासह विविध विषयावर महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे अध्यक्ष व युवानेते धवलसिंह मोहिते पाटील मार्गदर्शन करणार आहेत.