
लोकशासन- प्रतिनिधी : इंदापूर ग्रामीण
इंदापूर तालुक्यातील ५४ फाट्यावर असलेल्या दारे क्रमांक ३ ते ६ वरील शेतकऱ्यांची शेती भिजण्या अगोदरच या शेतकऱ्यांनचे पाणी बंद करण्यात आल्याने या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी तीव्र शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे.
इंदापूर तालुक्यातील ५४ फाट्यावरील दारे क्रमांक ३ ते ६ वरती निमसाखर , शिरसटवाडी व रणगाव परीसरातील बहुतांश शेती भिजत असुन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी मिळण्या आधीच ५४ फाट्याचे पाणी बंद करण्यात आल्याने या भागातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत कालवा फोडण्याची मानसिकता दर्शविली होती.कोणतीहि पुर्व कल्पना न देताच शेतकऱ्यांची पिके जळत असताना अचानकपणे सार्वजनिक पाटबंधारे विभागा कडून पाणी बंद करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार रणवरे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र रणमोडे, ग्रामपंचायत सदस्य शेखर पानसरे,माजी उपसभापती जयकुमार कारंडे,माजी उपसरपंच पोपटराव कारंडे, विरसिंह रणसिंग, हर्षल रणवरे, युवराज मोरे, महादेव रणवरे,रणजीत कारंडे यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बाबतीत दिनांक ०८ मे रोजी निमगाव केतकी येथील सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटुन निवेदन देत शेतकरयांन मधुन नाराजी व्यक्त करण्यात आली असून.सार्वजनिक पाटबंधारे विभाग निमगाव केतकी यांच्या कडून निरा डाव्या कालव्या वरील दारे क्रमांक ३ ते ६ चे उन्हाळी आवर्तनाचे सिंचन पुर्ण झाले नसल्याने १४ मे पासून ५४ फाट्यावरील दारे क्रमांक ३ ते ६ चे आवर्तन पूर्ण करण्यात येईल असे पत्र देण्यात आले आहे.