
लोकशासन- प्रतिनिधी : शिवाजी पवार,इंदापूर
पाठीमागील सहा ते सात दिवसापासून तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात विद्यमान आमदार,गटविकास अधिकारी तसेच तालुक्यातील आत्तापर्यंत ५० टक्के ग्रामपंचायतींना तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून देण्यात आला.
०९ मे २०२३ रोजी शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रत्येक ग्रामपंचायतने आपल्या क्षेत्रातील दोन महिलांना वितरित करावा याबद्दल जीआर काढला होता. परंतु याची अंमलबजावणी २०२३ रोजी झाली गेल्या वर्षी याचा विसर तालुक्यातील ७० टक्के ग्रामपंचायतींना पडला.यामुळे यावर्षी ३१ मे च्या अगोदरच ०७ मे पासून अनिताताई खरात व इतरांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ठिकाणी जाऊन या पुरस्काराबद्दल जनजागृती करून गावातील प्रतिष्ठा नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामसेवक जे कोणी उपस्थित असतील त्यांना हे निवेदन देऊन हा पुरस्कार वितरित करण्याबद्दल विनंती करण्यात येत आहे. याची दखल घेऊन इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी आज १४ मे २०२५ रोजी इंदापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या पुरस्काराचे वितरण करावे असे परिपत्रक काढले आहे.
त्यामुळे अनिताताई खरात यांनी गटविकास अधिकारी सचिन खुडे यांचे मनःपूर्वक आभार मानले.त्या पुढे म्हणाल्या की आम्ही इंदापूर तालुक्यातील राहिलेल्या ५०% ग्रामपंचायत ही समक्ष ग्रामपंचायत क्षेत्रात जाऊन तेथील महिलांना, नागरिकांना ,सरपंचांना ,ग्रामसेवकांना विनंती करू की तेथील जास्तीत जास्त महिलांनी आपले प्रस्ताव ग्रामपंचायतीकडे द्यावेत व सरपंच ग्रामसेवक यांनी या आदेशाचे पालन करावे व येथून पुढे कायमच हा पुरस्कार वितरित करावा यासाठी राहिलेल्या ५०% ग्रामपंचायती आम्ही पुढील पाच ते सहा दिवसात पूर्ण करू.
आजपर्यंतच्या जनजागर यात्रेत प्रत्येक गावातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे, त्याबद्दल त्यांनी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व नागरिकांचे आभार मानले.तसेच अनिता खरात पुढे म्हणाल्या की आम्ही राज्य सरकारला ही निवेदन दिले आहे की हा पुरस्कार राज्यभर पूर्ववत चालू करण्यासाठी परिपत्रक काढावे,इंदापूर गटविकास अधिकारी यांनी आपल्या तालुक्यासाठी जस परिपत्रक काढलं तसे बाकी तालुक्यात ही प्रत्येक गटविकास अधिकाऱ्यांनी परिपत्रक काढावे व हा पुरस्कार राज्यात सर्व ग्रामपंचायतने वितरित करावा ही विनंती. जर बाकी तालुक्यात ग्रामपंचायत ने पुरस्कार दिला नाही तर पुढील वर्षी राज्यात सर्व तालुक्यात गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन २०२३ च्या जीआर प्रमाणे पुरस्कार देण्यास भाग पाडू