
लोकशासन- प्रतिनिधी गणेश गुप्ते,इंदापूर ग्रामीण
सणसर येथील राज्य शासन तसेच गणराया अवार्ड पुरस्कार प्राप्त आझाद तरुण मंडळाचे संस्थापक सभासद,जेष्ठ मार्गदर्शक, प्रसिद्ध पुरोहित श्रीकांत उर्फ शशी काका कृष्णाजी कुलकर्णी यांचे नातू तसेच मंडळाचे कार्यकर्ते केदार श्रीकांत कुलकर्णी यांचा मुलगा यश आरती केदार कुलकर्णी हा नुकत्याच झालेल्या इयत्ता दहावी मध्ये भवानीनगर केंद्रामध्ये ९६.४० टक्के गुण मिळवून प्रथम आला.श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे इंग्लिश मेडियम स्कूल मिडीयम चा विद्यार्थी आहे.
हे यश मिळवण्यासाठी यशने पहाटे चार वाजता उठून सहा वाजेपर्यंत अभ्यास, सहा नंतर क्लास व स्कूल जॉईन करणे व रात्री अकरा वाजेपर्यंत लिखाण करणे असा नियमित अभ्यास करून हे उत्तुंग यश मिळवल्याचे सांगितले. त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल त्याचा आझाद तरुण मंडळाच्या वतीने हार,शाल, श्रीफळ, बुके व श्री गणेशाची चांदीची मूर्ती देऊन व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी श्रीकांत कुलकर्णी, रमेश दादा निंबाळकर, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी प्रकाश शिंदे, ह.भ.प. सुरेश महाराज ढगे,अनिल गुप्ते, अण्णासो रायते, मिलिंद गाडे,संजय शिंदे, अध्यक्ष स्वप्निल शिंदे, संजय शिंदे, आर्यन गुप्ते,गणेश जाधव, योगेश गाडे, अक्षय कांबळे,स्वानंद गाडे,आनंद गाडे, ओम गाडे, इत्यादी उपस्थित होते.